पारोळा येथे ४६ रक्तदात्यांचे रक्तदान

0

पारोळा (प्रतिनिधी) : श्री दीप रक्तसेवा धुळे व संजीवनी मेडीकल चोरवड रोड पारोळा यांचा स्तुत्य उपक्रम कोरोना काळात रक्तदात्यांनी ४६ जणांनी केले.

श्री दीप रक्त सेवा ग्रुप धुळे व संजीवनी मेडिकल पारोळा यांच्या संयुक्त विद्यमानाने पारोळा येथे रक्तदान शिबिराचे आज दि,८ शनिवारी आयोजन  संजीवनी मेडीकल चोरवड रोड या ठिकाणी आयोजीत करण्यात आले होते.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पहाता रक्तपेढीतील रक्तसाठा दिवसेंदिवस अत्यल्प होत असतांना संजीवनी मेडीकलचे संचालक संदीप माने(पाटील)मल्हार कुंभार पारोळा शहर तलाठी निशिकांत माने(पाटील) व श्रीकृष्ण युवा गृप यांनी  रक्तदान शिबीर आयोजीत करून रक्तसाठ्यात वाढ करण्यात खारीचा वाटा उचलला आहे.सदर शिबीरास पारोळा तहसिलदार  अनिल गवांदे यांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले.सदर शिबीरात एकुण ४६ रक्तदात्यांनी रक्तदान केले.शिबीरास श्रीकृष्ण युवा गृप चोरवड रोड यांचे सहकार्य  लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.