कोरोना रुग्णांसाठी मानियार बिरदारीचा दुसरा दिलासा ; सिटी स्कॅन फक्त १८००/- रुपयाला

0

जळगाव : जळगाव शहरातच नव्हे तर जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले असून प्रत्येक रुग्णाची एच आर सी टी टेस्ट करण्याचा सल्ला  तज्ञा डाक्टर देत आहे.

जळगाव शहरात सदर ची तपासणी २५०० ते ४००० रु पर्यंत होत आहे परंतु सर्व सामान्य घरातील दोन,तीन रुग्णां ची तपासणी करावी लागत असल्याने हा फार मोठा खर्च वाढत होता म्हणून या सर्व बाबीचा विचार करून जळगाव जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेली जळगाव जिल्हा मुस्लिम मानियार बिरादरी ने सारा मल्टिपरपज हॉस्पिटल चे व्यवस्थापकीय संचालक डॉ मिनाझ पटेल यांच्या सहकार्याने रुग्णांसाठी एच आर सी टी टेस्ट फक्त एक हजार आठशे रुपयात उपलब्ध करून दिली आहे.

त्यासाठी रुग्णांनी आपला आधार कार्ड व डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्श  घेऊन खालील  ठिकाणी प्रत्यक्ष संपर्क साधून कुपन हस्तगत करावे व ते कुपन घेऊन सारा हॉस्पिटल, जलगाव येथे तपासणी करावी असे आवाहन जळगाव जिल्हा मुस्लिम मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख( ९४२३१८५७८६) यांनी एका पत्रका द्वारे  केले आहे.

कुपन मिळण्याचे ठिकाण जळगाव

१) जळगाव जिल्हा मानियार बिरादरी चे कार्यालय,रथ चौक,जलगाव

२)मुस्लिम इदगाह व कब्रस्थान कार्यालय,अजिंठा रोड, जळगाव

३)स्पोर्ट्स हाऊस, नूतन मराठा शॉपिंग कॉम्प्लेक्स,जळगाव.

भुसावळ

४) इम्तियाज शेख,नगरसेवक, 32 खोली,रॉकेल डेपो,भुसावळ

 संपर्कासाठी

★फारुक शेख( ९४२३१८५७८६)

★ऍडआमीर शेख (९४२३४८७७८६)

★अल्ताफ शेख ( ९४२३९७८६११)

★इम्तियाज शेख ९९२३४७३२२१

Leave A Reply

Your email address will not be published.