कोरोना महामारीमुळे कोणीही भुकेले राहता कामा नये ; खा. रक्षा खडसे

0

भुसावळ : रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार रक्षाताई खडसे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब मजूर कामगार निराधार यांना अन्नदान करण्याचा निर्णय घेतला आहे. खा रक्षाताई यांच्याकडून गोरगरीब निराधारांना 14 एप्रिल पर्यंत दररोज अन्नदान सुरू आहे. आज भुसावळ येथे खासदार रक्षाताई खडसे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात अन्नदान केले. याकामी रेल्वेच्या IRCTC विभागाचे सहकार्य मिळालेले आहे   दररोज 1500 फूड पॅकेट वितरित करण्यात येत आहेत. याकामी मिळालेला प्रतिसाद पाहून खासदार रक्षाताई खडसे यांच्या सूचनेनुसार उद्या पासून या फूड पॅकेट्स ची संख्या वाढवून 2000 करण्यात येणार आहे. 14 एप्रिल पर्यंत म्हणजेच लॉक डाऊन असेपर्यंत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे आजच्या अन्नदानाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी खासदार रक्षाताई खडसे, आमदार संजयजी सावकारे,  नगराध्यक्ष रमणभाऊ भोळे भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रा.डॉ सुनील नेवे,  शहर अध्यक्ष दिनेश नेमाडे, सरचिटणीस पवन बुंदेले, नगरसेवक प्रमोद नेमाडे, गिरीश महाजन, अनिकेत पाटील, सुमित बर्हाटे ,पृथ्वीराज पाटील इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.