धक्कादायक : कोरोना बाधित रुग्णाची आत्महत्या

0

बुलढाणा : अकोला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात कोरोना संसर्गित रुग्ण म्हणून दि.७ एप्रिल रोजी दाखल झालेला रुग्ण आज (दि.११) पहाटे पाच वाजेच्या सुमारास गळा कापलेल्या अवस्थेत बाथरूममध्ये रक्तबंबाळ असल्याचे दिसून आले. रुग्णालय स्टाफच्या लक्षात येताच त्याचेवर उपचार सुरू करण्यात आले. शस्त्रक्रिया सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला असे अधिष्ठाता,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,अकोला यांनी कळवले आहे. मयत रुग्णाचे नाव मोहम्मद जहरुल इस्लाम (वय ३०वर्षे) असे असून तो मूळचा सालपडा जि. नागाव,आसाम येथील रहिवासी आहे. काल दि.१० रोजी आलेल्या अहवालात हा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते.

यासंदर्भात पोलीस अधिक तपास करीत आहेत, असेही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने कळवले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.