कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे नगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन

0

बालकांचे बाधित होण्याचे प्रकार आले उघडकीस

अमळनेर(प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यातील कोविड १९ वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर ५% पेक्षा कमी आल्यामुळे लॉकडाऊन चे निर्बंध शिथिल झाले असले तरी, अमळनेर तालुक्यातील २ बालके कोरोना बाधित आढळून आले आहेत. शहरात गर्दी वाढू लागली असून ही चिंतेची बाब आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वच घटकांचा सहभाग महत्वाचा असल्याने कोरोनाबधितांची संख्या कमी होत असली तरी, गाफील राहून चालणार नाही. कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही यासाठी नागरिकांनी अधिक दक्ष राहणे आवश्यक आहे.शासनाकडून आणि जळगाव जिल्हाधिकारी यांच्याकडून निर्गमित करण्यात आलेल्या कोविड १९ नियमावलीचे काटेकोर पालन करण्यासाठी पोलीस प्रशासन तसेच लोकनियुक्त नगराध्यक्षा,उपनगराध्यक्ष सर्व सभापती, नगरसेवक-नगरसेविका तसेच मुख्याधिकारी नगरपरिषद अमळनेर यांच्यातर्फे शहरातील नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.