कोरोना काळात विनाअनुदानित शिक्षकांचे कार्य कौतुकास्पद – भरत अमळकर

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

कोरोनामूळे अनेकांच्या चूली बंद पडून त्यांचे परीवार रस्त्यावर आले, यामुळेच मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत, यावर उपाय म्हणून शिक्षकांनी अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, कोरोना काळात वेतनधारी शिक्षकांनी केलेले कार्य चांगले असून त्याहून अधिक कौतुकास्पद कार्य विनाअनुदानित शिक्षकांचे आहे, असे प्रतिपादन केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर यांनी केले.

भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेतर्फे ५ सप्टेंबर शिक्षक दिना निमीत्त ‘शिक्षक दिन कृतज्ञता सोहळा’ या कार्यक्रमाअंतर्गत जळगाव शहर (१५ शिक्षक), जळगाव तालूका (१० शिक्षक) व धरणगाव तालूका (१० शिक्षक) या भागातील कला, क्रिडा, नृत्य, साहित्य, सामाजिक व पर्यावरण आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

शहरातील काव्यरत्नावली चौक परिसरातील भाऊंचे उद्यानात हा कार्यक्रम संपन्न झाला.  दीपप्रज्वलनासह डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून कार्यक्रमास सुरूवात झाली.

प्रमुख पाहूणे म्हणून लेखक, कवी तथा प्रेरणादायी वक्ते मनोज गोविंदवार, रतनलाल सी बाफना ज्वेलर्सचे जनसंपर्क अधिकारी मनोहर पाटील, भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेचे प्रदेशाध्यक्ष ॲड.राहूल वाकलकर आदी मान्यवरांसह जिल्हाध्यक्ष अनिल बाविस्कर, उपाध्यक्ष अविनाश जावळे, महासचिव सागर महाजन, सचिव आकाश पाटील आदी उपस्थित होते.  यावेळी मनोज गोविंदवार, ॲड.राहूल वाकलकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अविनाश जावळे यांनी मनोगत व्यक्त करून शिक्षक दिनाचे महत्व सांगितले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवा परिषदेचे जिल्हा समन्वयक इरफान पिंजारी, भावेश रोहीमारे, किरण तायडे, राहूल पाटील, धनश्री ठाकरे, विद्या कोळी, नयनकुमार पाटील यांच्यासह धरणगाव तालूका पदाधिकारी श्रावण धनगर, निलेश पवार, चंदन अत्तरदे, कल्पेश बोरसे, अनिकेत सोनवणे, शहर पदाधिकारी सौरभ जैन, धनश्री माळी, तालूका पदाधिकारी तूषार विसपुते, उमेश सुर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.

प्रास्ताविक युवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल बाविस्कर यांनी केले.  सूत्रसंचालन जिल्हा समन्वयक राहूल पाटील यांनी केले तर जिल्हा समन्वयक धनश्री ठाकरे यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.