कोरोनाची भीती आणि पोल्ट्री व्यवसायात जबर मंदी !

0

लासुर ता.चोपडा(परेश पालीवाल) :- सध्या देशासह राज्यात कोरोना या रोगाने प्रचंड असा हाहाकार माजवला असून त्याचा अनेक क्षेत्रात फटका जाणवत आहे.रोगाची भीती मनात असतांनाच काहीनी खोडसर वृत्तीने कोंबडीचे चिकन खाल्याने कोरोना होतो अशी अफवा पसरवल्याने लोक सध्या मांसाहार करणे पूर्णपणे टाळत असून याचा फटका पोल्ट्री व्यवसायाला बसत असल्याचे लासुर येथील पोल्ट्री व्यावसायिकांनी दै. लोकशाहीशी बोलतांना सांगितले.

यावेळी पोल्ट्री फार्मला भेट दिली असता आपल्या सहज मोजता येतील एवढेच पक्षी आढळून आले यास कारण की बाजारात मागणी घटल्याने कोंबड्यांचा भावात मोठी घसरण झाली असून ती पौल्ट्री व्यावसायिकांना न परवडणारी असल्याने काही दिवस पौल्ट्री व्यवसाय थांबवल्या असल्याचे ते म्हणाले.

“मांसाहार केल्याने कोरोना होतो असा गैरसमज ग्रामस्थांमध्ये निर्माण झाला असून याचा जबर धक्का पोल्ट्री व्यवसायावर पडला असून मंदीचे सावट आहे-(मयुरेश कुंभार-पोल्ट्री व्यावसायिक)

पक्ष्यांचा दरात झालेली घसरण

              महिना             दर (प्रती किलो)

नोव्हेंबर २०१९               १६० रूपये

डिसेम्बर २०१९               १८० रुपये

जानेवारी २०२०               ११० रुपये

फेब्रुवारी २०२० (१५-३०)      ५५ रुपये

मार्च २०२०               ३५ रुपये

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.