करोना आजाराची गंभीरता लक्षात घेऊन शिक्षणोत्सव कार्यक्रम पुढे ढकला !

0

पाचोरा (प्रतिनिधी) : करोना विषाणूचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक  उपाय म्हणून शासनाने जिथे गर्दी जमेल असे मेळावे, परिषदा, उत्सव इ. चे आयोजन करण्यात येऊ नयेत, असे आवाहन यापूर्वीच केले आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाच्या वतीने या आठवड्यात  तालूकास्तरावर आयोजीत  होणारा आणि पुढच्या आठवडयात जिल्हास्तरावर आयोजीत होणारा शिक्षणोत्सव कार्यक्रम करोना विषाणूचा प्रार्दूभाव टळत नाही तोपर्यंत पुढे ढकलण्यात यावा, असे निवेदन जळगांव जिल्हा शिक्षकसेनेच्या वतीने जि.प.जळगांवचे शिक्षण सभापती – रविंद्र सुर्यभान पाटील आणि उपशिक्षणाधिकारी- डॉ. डी.एम. देवांग यांना दि. ११ रोजी देण्यात आले. उपशिक्षणाधिकारी डॉ. डी. एम. देवांग यांनी निवेदनासंदर्भात संचालक,  महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पूणे यांचेकडून मार्गदर्शन मागवण्याची कार्यवाही शिक्षकसेना पदाधिकाऱ्यांच्या समक्ष लागलीच केली आणि शिक्षणोत्सव आयोजनाबाबत लवकरच शिक्षण विभागाच्या वतीने कळविले जाईल, असे आश्वासन उपस्थित शिक्षकसेना पदाधिकाऱ्यांना याप्रसंगी दिले.

याप्रसंगी शिक्षकसेना जिल्हाध्यक्ष ईश्वरभाऊ सपकाळे, सरचिटणीस – राधेशाम पाटील, जिल्हा प्रसिध्दीप्रमुख – संदीप पवार, जिल्हा कार्याध्यक्ष – राजेश जाधव, सहचिटणीस – वासुदेव चौधरी, उपाध्यक्ष – उखर्डू चव्हाण, माध्यमिक शिक्षक सेना कार्याध्यक्ष – गोविंदा पाटील, संघटक – प्रदीप हिरोळे तसेच इतर पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.