स्वराज्य आणि स्वत्व रक्षणासाठी संभाजी राजेंचे इतिहासातील सर्वश्रेष्ठ बलिदान – डॉ. अनिल देशमुख

0

पाचोरा (प्रतिनिधी) :  महाराष्ट्राच्या मातीतील धैर्यशील महावीर आणि देशाचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान म्हणजे स्वराज्य आणि स्वत्व, स्वधर्माचे रक्षण करण्यासाठी स्वीकारलेले हौतात्म्य इतिहासातील सर्वश्रेष्ठ बलिदान आहे. संभाजीराजांचे व  स्वराज्य रक्षणातील योगदान व समर्पण इतिहास कधीच विसरू शकणार नाही. असे प्रतिपादन डॉ. अनिल देशमुख यांनी केले.

दि. ११ रोजी पाचोरा येथे छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिवसाच्या निमित्ताने संभाजी महाराज चौकात अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी  भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, तालुका सरचिटणीस गोविंद शेलार, संजय पाटील, शहराध्यक्ष रमेश वाणी, सामाजिक कार्यकर्ते मनिष काबरा, इतिहास प्रबोधन संस्थेचे रवींद्र पाटील, प्रज्ञावंत आघाडीचे तालुकाध्यक्ष सुनील रंगराव पाटील उपस्थित होते. यावेळी बोलतांना डॉ. देशमुख यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनतील महत्त्वपूर्ण घटनांची माहिती देत  महाराजांचे शिक्षण, युद्धकौशल्य  आणि युद्धातील पराक्रमी विषयी उपस्थितांना माहिती दिली.  यावेळी इतिहास प्रबोधन संस्थेचे रवींद्र पाटील यांनीही समयोचित विचार मांडले. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रसंगी सुधीर पुणेकर, किशोर संचेती, नितीन पाटीलळ राजेश संचेती, घनश्याम अग्रवाल, निलेश मिश्रा, रमेश रामाणी, डॉ. भागवत देवरे, रोहन मिश्रा, सामाजिक कार्यकर्ते संतोष मोरे, योगेश सोनार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.