कोरोनाचा विस्फोट : देशात गेल्या 24 तासात 4 लाख 14 हजार188 नवीन रुग्ण

0

नवी दिल्ली : देशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचा विस्फोट होताना पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे चार लाखांहून अधिक नवीन रुग्ण सापडले आहेत. तर 3 हजार 915 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले.

सलग दुसऱ्या दिवशी गेल्या 24 तासात भारतात 4 लाख 14 हजार 188 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. म्हणजेच आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात जवळपास दोन हजारांनी वाढ झाली आहे. तर 3 हजार 915 रुग्णांना प्राण गमवावे लागले. आधीच्या दिवशी भारतात एका दिवसातील सर्वाधिक कोरोनाबळींची ( 3 हजार 980) नोंद झाली होती. आजचा आकडा कमी असला, तरी त्याच्या जवळ जाणारा आहे. दिलासादायक बाब ही, की कालच्या दिवसात देशात 3 लाख 31 हजार 507 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. ही संख्याही आदल्या दिवसापेक्षा अधिक आहे

आतापर्यंत देशात 1 कोटी  76 लाख 12 हजार 351 रुग्ण बरे झाले आहेत. भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 14 लाख 91 हजार 598 वर गेला आहे. आतापर्यंत 2 लाख 34 हजार 83 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 36 लाख 45 हजार 164 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.