कोणताही पक्ष कार्यकर्त्यांमुळे मोठा असतो, नेत्यांमुळे नव्हे ; गिरीष महाजनांनी लगावला खडसेंना टोला

0

चाळीसगाव (प्रतिनिधी) : पक्ष हा लहान असो किंवा मोठा ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. नेत्यांमुळे पक्ष मोठा होत नसतो. नेते येतात आणि जातातही. कार्यकर्त्यांची फळी पक्षाला मोठे करते. अशा शब्दात माजीमंत्री गिरीष महाजन यांनी एकनाथराव खडसे यांच्या पक्षांतराचा उल्लेख न करता आपलं मन मोकळं केलं.

 

मंगळवारी सायंकाळी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांन मध्ये काय चलबिचल सुरू आहे याची माहिती जाणून घेण्यासाठी भा ज पा ने मुंबई हून प्रदेश संघटनमंत्री पाठवले, त्यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील हाॕटेल ग्रीन लीफ मध्ये भाजपच्या प्रमुख पदाधिका-यांसह ग्रामीण व शहर मंडळांची संघटनात्मक बैठक झाली. त्यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना माजी मंत्री महाजन बोलत होते.

 

यावेळी प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक, उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री रवी अनासपूरे, महाराष्ट्र जनजातीय क्षेत्र राज्य संपर्क प्रमुख किशोर काळकर, खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, रावेर लोकसभा विस्तारक डाॅ. विजय धांडे, जळगाव लोकसभा विस्तारक सचिन पानपाटील, महाराष्ट्र किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पोपट भोळे, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील, माजी मंत्री एम. के. आण्णा पाटील,  नगराध्यक्षा आशालता चव्हाण, माजी आमदार साहेबराव घोडे, सुनिल निकम, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील,पं. स. चे भाजपा गटनेते संजय पाटील, न. पा. गटनेते संजय रतनसिंग पाटील आदी उपस्थित होते.

 

बैठकीत काही ग्रामीण भागातील पदाधिका-यांनी विधानसभा निवडणुकीत आपल्याच  काही प्रमुख लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यात. अशी ग्रहाणी मांडली असत. याचाही गिरीष महाजन यांनी बैठकीत चांगलाच समाचार घेतला. विधानसभा निवडणुकीत काय झाले. या प्रश्नाचे उत्तर देताना काही लोकप्रतिनिधीं कडे कटाक्ष टाकून ,याची पूर्ण माहिती आपल्याला आहे. असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. कार्यकर्ते व पदाधिका-यांची मतेही जाणून घेतली.

 

प्रारंभी भारतमाता, श्यामाप्रसाद मुखर्जी व पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. मान्यवरांना ज्ञानेश्वरी देऊन स्वागत करण्यात आले.

 

बैठकीला माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, लोकप्रतिनिधी, शहर व ग्रामीण कार्यकारणी सदस्य, सर्व आघाड्यांचे प्रमुख व कार्यकारणी सदस्य आदींसह   पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.