कॉग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष संजय वराडे यांचे सह तिघांना पोलीस कोठडी

0

जळगाव- परस्परांविरोधात तक्रारीवरुन कॉग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष संजय रामभाऊ वराडे यांचे सह तिघांना अटक करून पोलीस कोठडित रवानगी करण्यातआली आहे

कारच्या काचा फोडून कॉग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष संजय रामभाऊ वराडे रा.अयोध्यानगर यांना चापटा बुक्क्यांनी मारहाण करुन सोन्याची अंगठी तसेच 5 हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना शुक्रवारी भास्करमार्केटसमोर घडली होती.

याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात परस्परांविरोधात तक्रारीवरुन गुन्हे दाखलकरण्यात आले आहे वराडे यांच्या फिर्यादीवरुन सहा जणांविरोधात दाखल गुन्ह्यात दोन जणांना अटक करण्यात आली असून कलाबाई शिरसाठ यांच्या तक्रारीवरून संजय वराडे यांना अटक करण्यात आली सर्वांना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक संदीप आराक यांच्यासह कर्मचार्‍यांनी शनिवारी संशयित कलाबाई नारायण शिरसाठ रा. पाळधी ता.धरणगाव व संदीप उर्फ मुन्ना मांगीलाल जैन वय 38 रा. आर.एल.कॉलनी, पिंप्राळा, जळगाव या दोघांना शनिवारी सकाळी अटक केली. जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 1 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणातील अज्ञात चार इसम फरार आहेत.

परस्पराविरोधात गुन्हा दाखल संजय वराडेसह कलाबाई शिरसाठ यांनीही तक्रार दिली असून दोघांच्या तक्रारीवरुन परस्परांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कलाबाई नारायण शिरसाठ यांनीही फिर्याद दिली असून त्यांनी संजय वराडे याने विनयभंग करुन जातीवाचक शिवीगाळ दिल्याचे म्हटले आहे. त्यावरुन पोलिसांनी संशयित संजय वराडे यांना अटक केली असून त्यालाही 1 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास डॉ. निलाभ रोहन करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.