कॉंग्रेसचे बडे नेते भाजपच्या संपर्कात : गिरीष महाजन

0

जळगाव :- विरोधी पक्षातील अनेक बडे नेते राज्य सरकार व भाजपच्या कामांचे कौतुक करीत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसचे अनेक मोठे नेते व त्यांचे मुले भाजपच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट जलसंपदामंत्री ना.गिरीष महाजन यांनी केला आहे. जळगावातील संपर्क कार्यालयात ते बोलत होते.

राष्ट्रवादीचे नेते विजयसिंग मोहिते-पाटील यांचा मुलगा रणजितसिंग मोहिते-पाटील हे एक-दोन दिवसात भाजपात अधिकृत प्रवेश करणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. तसेच जळगाव मतदारसंघासाठी उमेदवाराची निवड ही समितीच्या माध्यमातून येत्या एक-दोन दिवसात केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, राज्यात व केंद्रात भाजपाने केलेल्या विविध विकास कामांचे विरोधकांकडून कौतुक होत असून कॉंग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांसह सुशिक्षित पिढीनेही आपला मोर्चा भाजपकडे वळविला आहे. त्यामुळे निवडणुकींच्या तोंडावर राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. त्यांच्याकडे काहीही शिल्लक राहिले नसून त्यांनी एकतरी खासदार किंवा आमदार विरोधकांनी निवडून दाखवावा, असेही आव्हान त्यांनी दिले. जळगाव लोकसभ आणि रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांची नावे आम्ही दिल्लीला पाठविले नसून पक्षाचे ज्येष्ठ नेत्यांनी आपल्या अहवालानुसार नवे निश्चित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.