माहेजी येथे शेतीच्या वादातुन भावाकडुन बहिणीस मारहाण

0

भांडण सोडविण्यासाठी आलेल्या मावस भावावर धारदार शस्त्राने हल्ला

पाचोरा :– तालुक्यातील माहेजी येथे हरदास वाड्यातील रहिवासी असलेल्या बहिण – भावात आदल्या दिवशी शेतीच्या हिस्स्यावरुन वाद झाल्याने बहिणीने पाचोरा पोलिस स्टेशन गाठुन बहिणीने भावा विरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्याचा राग येवुन दुसऱ्या दिवशीही माझ्या विरुद्ध पोलिसात तक्रार का दाखल केली? असा जाब विचारुन भावाने बहिणीस मारहाण करित असतांना भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या मावस भावाच्या डाव्या हातावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना घडल्याने पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हाची नोंद करण्यात आली आहे.

माहेजी येथील हरदास वाड्यातील रहिवासी रजिया शेख अब्दुल या महिलेस निलोफर शेख अब्दुल व हनिम शेख अब्दुल असे दोन अपत्ये असुन या महिलेने मुलगा हनिम शेख यास ट्रक्टर व सहा एकर जमीन दिलेली आहे. व मुलगी निलोफर शेख अब्दुल हिच्याकडे आईने दिलेली आणि स्व: कमाईची मिळुन आठ एकर जमीन आहे. मात्र बहिणी कडे असलेल्या जमिनीतील काही जमिन मला मिळावी यासाठी भाऊ हनिम शेख हा बहिण निलोफर शेख हिच्याशी नेहमी हुज्जत करित असतो. दि. १८ रोजी हनिम शेख याने जमिनीचा वाद उपस्थित करुन बहिणीस मारहाण केल्याने निलोफर शेख हिने पाचोरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र त्याचा राग येवुन दुसऱ्या दिवशी दि. १९ रोजी पुन्हा हरदास वाडा येथे भावाने बहिणीला माझ्या विरुद्ध पोलिसात तक्रार का दाखल केली ? अशी विचारणा करुन बहिणीस मारहाण केली. दरम्यान झालेल्या झटापटीत निलोफर शेख अब्दुल हिच्या गळ्यातील चार तोड्याची पोत लपास झाली. याच हाणामारीत मध्यस्थी करण्यासाठी आलेला मावस भाऊ सलमान शेख युनुस याच्या डाव्या हातावर काहीतरी धारदार शस्त्राने वार करुन त्यास जखमी केले. घटनेप्रकरणी बहिण निलोफर शेख हिने भाऊ हनिम शेख याचे विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार रामदास चौधरी हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.