केरळमध्ये मान्सूनचे आगमन 28 मेपर्यंतअपेक्षित ; स्कायमेट

0

कोची: संपूर्ण भारताला प्रतीक्षा असलेल्या मान्सूनचे आगमन केरळमध्ये 28 मेपर्यंत अपेक्षित आहे. काही अडचणींमुळे जास्तीत जास्त 2 दिवसांच्या अंतराने का होईना पण मान्सून केरळमध्ये येईल, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.  केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर भारतातील अन्य भागात देखील वेळेवर दाखल होईल, असे देखील या अंदाजात म्हटले आहे.

1960-2019 मधील आकडेवारीच्या आधारे यावर्षी नैऋत्य मॉन्सूनच्या तारखांचे  संशोधन करण्यात आले आहे. अंदमानच्या समुद्रात होणारे आगमन 20 मेच्या ऐवजी 02 दिवसांनी पुढे ढकलले आहे. ते आता 22 मे वर गेले असल्याचे देखील स्कायमेटने म्हटले आहे.

तथापि, केरळमध्ये 1 जूनच्या आधी मान्सूनची सुरुवात होईल हे मात्र कायम आहे. देशाच्या मध्यातील बर्‍याच भागांमध्ये येण्यासाठी तीन ते सात दिवसांचा उशीर होणार आहे तर  उत्तर-पश्चिम भारतामध्ये सुमारे आठवडाभर लांबणीवर पडू शकतो, असेही स्कायमेटने  म्हटले  आहे

Leave A Reply

Your email address will not be published.