केंद्र सरकारच्या संकुचित,कोत्या मनाचा निषेध ; धनंजय मुंडे

0

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीमधील निवासस्थानी असणारी सुरक्षा केंद्र सरकारने हटवल्यानंतर राष्ट्रवादीचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी संतप्त प्रतिक्रया दिली आहे.

“ईडी चौकशी झाली, मेगाभरती करून आमदार फोडले, आता काय तर सुरक्षा काढली… किती नीच पातळी गाठणार? अहो, ज्या व्यक्तीला जनतेच्या मायेचं कवच आहे, त्याला भय कुणाचे… केंद्र सरकारच्या संकुचित, कोत्या मनाचा निषेध!” अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी आपल्या अधिकृत ट्विटरवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी सुरक्षेसाठी दिल्ली पोलिसांचे तीन आणि सीआरपीएफचे तीन जवान तैनात होते. मात्र २० जानेवारीपासून ही सुरक्षा हटवण्यात आली आहे. सुरक्षा काढण्याआधी कोणताही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती अशी माहिती शरद पवारांच्या दिल्लीमधील कार्यालयाकडून देण्यात आली आहे. यानंतर धनंजय मुंडे यांनी हा निर्णय केंद्र सरकारने संकुचित, कोत्या मनाने घेतल्याचा आरोप केला. आपल्या ट्विटर खात्यावर लिहिलेल्या संदेशात त्यांनी, ‘केंद्र सरकारने शरद पवार यांच्याविरोधात प्रथम ईडी चौकशी बसवली, नंतर पक्षाचे आमदार फोडले आणि आता सुरक्षा व्यवस्था काढली’ असा आरोप त्यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.