दुष्टहीनासाठी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरातुन सृष्टी पाहायला मिळते ;- गुलाबराव वाघ

0

360 रुग्णांची तपासणी 80 रुग्णवार होणार शस्त्रक्रिया

धरणगाव – येथे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त धरणगाव शिवसेना शहर शाखा व मुक्ती फौंडेशन चा वतीने आज 23 जानेवारी  हिदूऱ्हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जंयती निमित्त भव्य  नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिराचे उदघाटन शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांचा हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते सद्या चा परिस्थिती डोळ्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. यामुळे रुग्णांना मधुमेह या आजाराची लक्षणे दिसतात, म्हणून उतारवयात डोळ्यांची निगा राखण्यासाठी शिबिराचे आयोजन केले आहे,

कार्यक्रम चे प्रास्तविक तालुका प्रमुख गजानन नाना पाटील यांनी शिबिराचे महत्व पटवून सांगितले तर पी एम पाटील सर यांनी रुग्णांचा माध्यमातून शिवसेना नेहमी समाज उपोयोगी काम करत असते तर डॉ मिलिंद डहाळे यांनी आरोग्य शिबीर चे आयोजन करणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी कामधेनू गो शाळा चा माध्यमातून  नगरपालिकेस दान पेटी चा लोकार्पण सोहळा लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश सुरेश चौधरी व गुलाबराव वाघ  व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे कार्यालय प्रमुख विनोद रोकडे याचा वाढदिवसाच्या निमित्ताने सत्कार करण्यात आला, या कार्यक्रमात उपस्थित माजी नगराध्यक्ष सुरेश नाना चौधरी, उपनगराध्यक्ष अंजली विसावे, माजी नगराध्यक्ष उषा ताई वाघ, नगरसेविका कीर्ती मराठे, जना आक्का पाटील, उपतालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे नगरसेवक वासुदेव चौधरी, विलास महाजन, भागवत चौधरी, सुरेश महाजन, संघटक धिरेंद्र पुरभे, बुट्या पाटील, जयेश महाजन, अरविद चौधरी, गोपाल चौधरी, विलास पवार , तसेच कामधेनू गौ शाळचे अक्षय मुथा, संजय ओस्तवाल, निलेश ओस्तोवाल, प्रवीण कुंमट, उपस्थित होते

सूत्रसंचालन विनोद रोकडे यांनी केले तर आभार शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र महाजन यांनी केले. मुक्ती फौंडेशन चे अध्यक्ष मुकुंद गोसावी यांनी डोळ्याचा शस्त्रक्रिया विषयी सविस्तर माहिती दिली.

कर्यक्रम यशस्वीतेसाठी वैद्यकीय अधिकारी  डॉ गिरीष चौधरी  व यांचे सर्व सहकारी डॉक्टर यांनी मेहनत घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.