केंद्र सरकारकडून मास्क आणि सॅनिटायझरच्या किंमती निश्‍चित

0

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र सरकारने मास्क आणि सॅनिटायझरच्या किंमती निश्‍चित केल्या आहेत. केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री राम विलास पासवान यांनी ट्‌विट करत ही माहिती दिली. 200 मिली सॅनिटायझरची किंमत 100 रुपयांपेक्षा जास्त राहणार नाही. तसेच त्यांनी मास्कची किंमत देखील निश्‍चित करण्यात आली असल्याचे सांगितले.

राम विलास पासवान यांनी याविषयी माहिती दिली. ‘कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यापासून बाजारात विविध प्रकारचे मास्क, तसेच त्याच्या उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू आणि सॅनिटायझरच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. सरकारने याला गांभिर्याने घेत त्यांच्या किंमती निश्‍चित केल्या आहेत.’

सरकारने मास्कच्या निश्‍चित केलेल्या किंमतीबाबत पासवान यांनी सांगत असताना, ‘अत्यावश्‍यक वस्तू कायद्यांतर्गत 2 आणि 3 प्लाय मास्कमध्ये वापरल्या जाणाऱ्या कपड्याची किंमत 12 फेब्रुवारी 2020 रोजी जशी होती तशीच राहतील.’ तसेच त्यांनी 2 प्लाय मास्कची किरकोळ किंमत 8 रुपये आणि 3 प्लाय मास्कची किंमत 10 रुपयांपेक्षा जास्त असणार नाही, असे देखील सांगितले.

दरम्यान, कोरोना विषाणूमुळे सॅनिटायझरसच्या किमती दुप्पटीने वाढल्या आहेत. या किमतीवर रोख लावत सरकारने सॅनिटायझरची किमती निश्‍चित केल्या आहेत. ‘सॅनिटायझरच्या 200 मिली बॉटलची किरकोळ किंमत 100 रुपयांपेक्षा जास्त होणार नाही. तर इतर आकाराच्या बॉटल्सच्या किंमतीही त्याच प्रमाणात राहतील. 30 जून 2020 पर्यंत या किमती देशभर लागू राहतील.’, असे रामविलास पासवान यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.