केंद्र शासनाकडुन जन शिक्षण संस्थानचा गौरव

0

जळगाव : कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान जळगावचा कोरोनाविषयक उत्कृष्ट कार्याबद्दल कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाकडुन गौरव व कौतुक करण्यात आले असुन तशा आशयाचे प्रशंसापत्र कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे केंद्रीय मंत्री डॉ महेंद्रनाथ पांडेय यांच्याकडुन संस्थेचे संचालक रवींद्र कुडाळकर यांना प्राप्त झाले आहे.

संस्थेच्यावतीने समाजातील विविध गरजु व उपेक्षित उद्दिष्टगटांसाठी कोरोना विषयक जनजागृतीसह मोफत मास्क वाटप सॅनिटायजर वाटप व धान्यवाटप उपक्रम राबविण्यात आले. त्याची दखल घेऊन संस्थेचे कर्मचारीवृंद साधन व्यक्ती व लाभार्थी यांची प्रशंसा केंद्र शासनाने केली आहे.
अडावत येथील प्रशिक्षणार्थींनी मास्क निर्मितीचा व्यवसाय चालु करुन स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे राहण्याचा प्रयत्न केला असुन त्यांच्या मास्कला वाढती मागणी आहे.

डॉ रामकृष्ण सुरा संचालक जन शिक्षण संस्थान विभाग कौशल्य विकास व उद्योकता मंत्रालय भारत सरकार तसेच डॉ स्मिता पाटील जन शिक्षण संस्थान अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाविषयक उपक्रम संपन्न झाला असुन संस्थेचे कर्मचारी प्रदीप सोनवणे किर्ती पाटील शशिकांत साळुंखे विकास भदाणे तसेच प्रशिक्षिका स्मिता पोळ अनिता चौधरी संगीता देशमुख व प्रशिक्षणार्थी यांचा उपक्रमात सहभाग होता.

केंद्र शासनाच्या या गौरवाबद्दल आदिवासी सेवा मंडळाचे अध्यक्ष अॅडव्होकेट संदीप पाटील यांनी अभिनंदन केले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.