केंद्रीय गृहराज्यमंत्री भडकले; पत्रकाराची पकडली कॉलर (व्हिडीओ )

0

उत्तर प्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क 

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातल्याचा आरोप असणारे केंद्रीय मंत्री अजय मिश्रा पुन्हा एकदा वादात अडकले आहेत. अजय मिश्रा यांच्या मुलाला अटक करण्यात आलेली असून सध्या जेलमध्ये आहे.

https://twitter.com/shiva_shivraj/status/1471064474073251841?s=20

यामुळे अजय मिश्रा यांनी राजीनामा द्यावा यासाठी विरोधकांकडून वारंवार दबाव आणला जात आहे. यादरम्यान अजय मिश्रा यांनी पत्रकाराची कॉलर पकडल्याचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. इतकंच नाही तर त्यांनी तिथे उपस्थित प्रसारमाध्यांनाही शिवीगाळ केली.

अजय मिश्रा यांना नवीन चौकशी अहवालात त्यांचा मुलगा आशिष मिश्राविरोधात अजून गुन्हे दाखल करण्याची शिफारस करण्यात आल्याबद्दल विचारण्यात आलं असता ते संतापले. यावेळी प्रश्न विचरणाऱ्या पत्रकाराला त्यांनी “हे असले मूर्ख प्रश्न विचारु नका. तुमचं डोकं फिरलं आहे का?,” अशा शब्दात सुनावलं.

केंद्रीय गृहराज्यमंत्री असणाऱ्या अजय मिश्रांनी यावेळी रिपोर्टरचा माईक खेचून घेत ‘माईक बंद कर रे’ असंही म्हटलं. यावेळी त्यांना पत्रकारांचा ‘चोर’ असा उल्लेख केला. अजय मिश्रा लखीमपूर खेरी येथे एका ऑक्सिजन प्लांटचं उद्धाटन करण्यासाठी आले होते. याआधी आदल्या दिवशी त्यांनी जेलमध्ये जाऊन मुलाची भेट घेतली होती.

 नेमकं काय आहे प्रकरण?

केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलावर शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांना मागून येऊन गाडीखाली चिरडल्याचा आरोप आहे. लखीमपूरमधील या घटनेत ४ शेतकऱ्यांचा आणि एका पत्रकाराचा मृत्यू झालाय. महिंद्रा थार गाडीसह एकूण ३ गाड्यांच्या ताफ्यानं शेतकऱ्यांना चिरडल्यानंतर घटनास्थळावर उपस्थित शेतकरी संतापले. त्यांनी ज्या गाड्यांनी आंदोलकांना चिरडलं त्या गाडीतील काही लोकांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत मंत्री अजय मिश्रा यांच्या महिंद्रा थार गाडीचा चालक आणि २ भाजपा कार्यकर्त्याचा मृत्यू झाला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.