कृषी विभागाकडून पीएम किसान योजनेचा लाभ देण्यास टाळाटाळ

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शेतकऱ्यांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या पीएम किसान योजनेचा लाभ हा अनुदान रजिस्ट्रेशन होऊन देखील मिळत नसून हे अनुदान लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे, असे निवेदन शेतकऱ्यांनी आज नायब तहसिलदार रमेश देवकर व कृषी अधिकारी बी. बी. गोर्डे यांना दिले.

या निवेदनात म्हटले आहे की, शासनाकडून पीएम किसान योजना राबविली जात आहे. याबाबत शेतकऱ्याचे रजिस्ट्रेशन होऊन अद्याप अनुदानाचे हप्ते मिळालेले नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची दिशाभूल होऊन सदर योजनेपासून शेतकरी वंचित आहे. या योजनेची माहिती तहसील कार्यालयात विचारली असता ते कृषी विभागाचे नाव सांगतात आणि कृषी कार्यालय येथे विचारपूस केली तर ते तहसील कार्यालय कडे बोट दाखवतात. यामुळे शेतकऱ्यांची दिशाभूल होत असून कृषी कार्यालयाने अनुदानाचा विषय हा तत्काळ मार्गी लावावा असे निवेदन देण्यात आले.

यावेळी रमेश शिरसाठ, कर्तारसिंग परदेशी, वस्तलाबाई वाणी, राजू पटेल, पांडुरंग शिरसाठ, ईसाक मलिक, राजेंद्र मोरे,योगेश महाजन, सौ. योजनाताई पाटील आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.