कृषि विभाग व आत्मा अंतर्गत किसान गप्पा गोष्टी कार्यक्रम संपन्न

0

शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करण्यास  प्राधान्य द्यावे : ना.गुलाबराव पाटील

जळगांव / धरणगाव | प्रतिनिधी
  शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती विकसित करावी. आत्मा अंतर्गत सहल व प्रशिक्षणा चा लाभ घ्यावा .शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती सोडून एकत्रित येऊन शेती गटालाही  प्राधान्य द्यावे. शेतकरी हित केंद्र बिंदू मानून  शेतकाऱ्यांच्या सदैव पाठीशी राहील असे प्रतिपादन ना. गुलाबराव पाटील यांनी केले.
शेतकऱ्यांनी  स्वतः शेतमालाची विक्री  करावी. फवारणी करतांना दक्षता घ्यावी, बियाणे खरेदी करतांना पक्के बिल घ्या , शेती सोबत अनुषंगिक लघुउद्योग सुरू करावे असे आवाहन सहकार राज्यमंत्री तथा शिवसेना उपनेते ना.गुलाबराव पाटील यांनी केले. कृषी विभाग व आत्मा अंतर्गत खरीप हंगाम पूर्व किसान गप्पा गोष्टी कार्यक्रम बोरगाव बु.येथे संपन्न झाला त्याप्रसंगी ना.गुलाबराव पाटील बोलत होते.
बिएएसएफ , सिंजेंटाया कंपनीच्या  प्रतीनीधींनी उपस्थितशेतकऱ्यांना ‘मका पिक व्यवस्थापन’  या विषयावर  मार्गदर्शन केले . शास्त्रज्ञ डॉ.हेमंत बाहेती यांनी कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी व श्री. काकडे यांनी भेंडी पिक व्यवस्थापन  या विषयावर मार्गदर्शन केले . ता.कृ. अधिकारी अभिनव माळी यानी धरणगांव तालूक्यात शेतकऱ्यांनी गट स्थापीत करुन  गटांनी सक्रीय होण्याचे आव्हान केले. शेतकरयांना गट शेती करून योजनेचा लाभ घेण्यास सांगितले.
कार्यक्रमा प्रसंगी व्यासपीठावर  तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी ,आत्मा समीती अध्यक्ष  राजेंद्र महाजन ,शास्त्रज्ञ , मंडळ कृषी अधिकारी श्री. संतोष कंखरे ,मा.सभापती दिपक सोनवणे ,न. पा.गटनेते पप्पु भावे , महिला आघाडीच्या जनाताई पाटील, अभय पाटील , सरपंच दगा मराठे , महेश मराठे , बिटीएम दिपक नागपूरे, आदी  उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन रमेश सांगळे यांनी केले .प्रास्तावीक तालुका कृषी अधिकारी अभिनव  माळी यांनी केले .आभार श्री.कंखरे यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.