कुलभूषण जाधवप्रकरणी आजपासून आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी

0
द हेग : भारताचे पाकिस्तानने अटक केलेले माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणात आपासून (सोमवारी) आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी होणार आहे. एकूण चार दिवस ही सुनावणी चालणार आहे. जाधव हे नौदलाचे निवृत्त अधिकारी असून, त्यांना पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने एप्रिल २०१७ मध्ये मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे.

काश्मीरमधील सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ही सुनावणी होत असल्याने संपूर्ण देशाचं लक्ष याकडे लागलं आहे. २१ फेब्रुवारीपर्यंत ही सुनावणी चालणार आहे.
कुलभूषण जाधव यांना लष्करी न्यायालयाने फार्स करून हेरगिरीच्या कथित प्रकरणात मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. त्यानंतर भारताने ८ मे २०१७ रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयात १९६३ च्या व्हिएन्ना करारातील दूतावास संपर्क सुविधेच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या मुद्दय़ावर दाद मागितली होती. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांना ठोठावण्यात आलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेला स्थगिती दिली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.