किरकोळ वसुली निविदेत महापालिकेचे नुकसान

0

जळगाव दि. 16-
महानगरपालिका किरकोळ वसुलीची 1 कोटी 86 लाखांची निविदा तत्कालीन स्थायी समितीने 1कोटी 20 लाखात मंजूर करून आर्थीक नुकसान केले. नागरिकांना त्रास तर ठेकेदाराचे हित जोपासले असल्याचे मनपा सुत्रांनी सांगितले.
महानगरपालिकेकडून हॉकर्सकडून 10 रु. ची पावती फाडून किरकोळ वसुली केली जात होती. तेव्हा महानगरपालिकेची किरकोळ वसुली ही 93 लाखाची होत होती. किरकोळ वसुलीची पावती 20 रु. झाल्याने मनपा प्रशासनाने तत्कालीन स्थायी समितीत 1 कोटी 86 लाखाचा निविदेचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र स्थायी समितीने निविदा 1 कोटी 20 लाखाची मंजूर केली. प्रशासनाकडून आकडा आल्यानंतर शासनाची परवानगी घ्यावी लागते. सदर निविदा ही 1 कोटी 86 लाखाच्याही वर जायला हवी होती. मात्र ती निविदा कमी करण्यात आली. शिवाय मनपा कर्मचार्‍यांच्या पगाराची रक्कम 30 लाख त्यातून वजा करण्यात आले आहे. निविदेतील रक्कम कमी करण्याचा अधिकार स्थायी समितीला नाही. या व्यवहारातून मनपाचे हित तर नाहीच नागरिकांना त्रास व ठेकेदाराचे हित जोपासले गेले असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले.सदर निविदा ही 1 एप्रिल ते 31 मार्च या आर्थीक वर्षात द्यायला हवा मात्र तो ठेकेदाराच्या हितासाठी मधुनच दिला गेला असल्याचे मनपा सुत्रांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.