रेशन दुकानदार महिलेशी अश्लिल वर्तन;

0

औद्योगिक वसाहत पोलिसांत गुन्हा दाखल

जळगाव दि. 16-
रेशनचे धान्य मिळाले नसल्याचा राग येवून एका नागरिकाने महिला रेशनदुकानदारासह सोडविण्यास आलेल्या महिलेच्या अंगावरील ओढणी ओढून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. सदर प्रकार मेहरुण परिसरात दि. 16 रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी महिला रेशनदुकानदाराच्या फिर्यादीवरुन औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मेहरुण परिसरातील एका रेशन दुकानात ग्राहकांना रेशनचे धान्य वितरण करण्यात येत होते. यावेळी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर चाटे व वैशाली चाटे रा. मेहरुण हे पती- पत्नी रेशन घेण्यास आले. रेशन दुकानावरील सेल्समन दिपक सपकाळे यास त्यांनी धान्य मागितले. रेशन कार्डावर तुमचा आर.सी. नंबर नसल्याने धान्य देता येणार नाही, अशी माहिती दिपकने दिली. याचा राग येवून ज्ञानेश्वर चाटेने त्यास शिवीगाळ करुन मारहाण केली. यावेळी महिला सहकारी अरे तु ऐसे क्या कर रहा है? असे म्हणत मध्यस्थीसाठी आली असता तिच्या अंगावरील ओढणी ओढून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्याचप्रमाणे रेशन दुकानातील इ- पॉस मशिनची वायर तोडली. या प्रकरणी महिला रेशनदुकानदाराच्या फिर्यादीवरुन औद्योगिक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडल्यापासून ज्ञानेश्वर चाटे हा फरार झाला आहे, त्याचा पोलीस सर्वत्र शोध घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.