किन्नर समाजातील प्रमुख राणी सविता जान (जगन मामा) यांचे अल्पशा आजाराने निधन

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरातील  गोलाणी मार्केटमध्ये रहिवासी असलेले तृतीयपंथ राणी सविता जान उर्फ जगन  मामा यांचे आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

त्यांच्या निधनामुळे जळगाव शहरातील किन्नर समाजात मोठी शोककळा पसरली आहे.  जळगाव शहरातील किन्नर समाजातील प्रमुख राणी सविता जान उर्फ जगन मामा हे अनेक वर्षांपासून गोलाणी मार्केटमधील चौथ्या मजल्यावरील  रहिवासी आहे.  मागील तीन महिन्यांपासून ते आजारी होते.  आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

जगन मामा यांच्यावर प्रेम करणारे हितचिंतक जगन मामांचे अंतिम दर्शन घेत आहे.  आज दुपारी २ वाजता जगन मामा यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.