किनगांव येथील तिन दुकाने आगीत जाळून खाक

0

किनगांव (प्रतिनिधी) : अहमदपूर तालुक्यातील किनगांव येथील सावरकर चौका जवळ किनगांव मेन रोड वर महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या समोरच्या बाजूस असलेले चार दुकानांना मंगळवारी रात्री साङे आठच्या दरम्यान विद्युत प्रवाहाच्या शाॅर्ट सर्कीटणे आग लागून दुकाने जागीच खाक झाले आहेत.

यात हाफीज शुकुरसाब मोमीन यांची “अब्दुल शुकुर मशीनरी स्टोअर्स” याचे एकुन 68 लाख,नसीर शुकुरसाब मोमीन यांची “सिमरण इटरप्रायजेस/फर्नीचर व मोबाईल शाॅपी” यांचे 28 लाख,गियासोद्दीन शुकुरसाब मोमीन यांची “न्यु अब्दुल शुकुर जनरल स्टोअर्स याचे 20 लाख तर शेख शफीक बशीरसाब यांची न्यु बालाजी क्लाॅथ सेटंर यांचे 10 लाखाचे एकुण एक कोटो सव्वीस लाखांचे नुकसान झाले आहे.यातील एका दुकानात आग लागली.माञ अहमदपूर येथील अग्निशमन दलाची गाङी येई पर्यंत आगीने रौद्र रूप धारण करून तीनही दुकाने कवेत घेतले.चौथ्या कापङाचे शोरूम ला आग लागली तो पर्यत अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली ही घटना.चार मे रोजी राञी साङेआठ वाजण्याच्या सुमारास अचानक शाॅर्ट सर्कीट होउन आग लागली.

असल्याचे सांगितले जाते.आग मोठ्या प्रमाणात असल्याने तीन तासाच्या नंतर आग आटोक्यात आली.या घटना स्थळी आमदार बाबासाहेब पाटील,संरपच किशोर मुंडे,अहमदपूर नगरपरिषदेचे नगर सेवक सय्यद मुन्ना यांनी भेट दिली.यावेळी सहायक पोलीस निरीक्षक शैलेश बंकवाङ,सहायक पोलिस उपनिरीक्षक गजानन अन्सापुरे यांनी ही घटनास्थळी धाव घेतली होती.बुधवारी सकाळी मंडळ अधिकारी सोपान दहिफळे,तलाठी हसंराज जाधव यांनी जळालेल्या दुकानाचा पंचनामा केला.या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे व्यापारी यांनी तहसीलदार यांना दिलेल्या अर्जात सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.