कासोदा येथे पोलिसांची कडक कारवाई ; 4 दुकाने सील

0

कासोदा ता, एरंडोल (प्रतिनिधी) : कासोदा तालुका एरंडोल सध्या कोरोना च्या दुसरा लाटेच्या सामना करताना प्रशासनाला व शासनाला नाकीनऊ आले आहे परंतु कासदा येथे काही दुकानदार अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व व्यवसाय व दुकाने बंद ठेवणे बाबतचे आदेश असताना आपली दुकाने सुरु ठेवत होती. म्हणून कासोदा पोलीस  स्टेशन व ग्रामपंचायत यांनी संयुक्त कारवाईचा धडाका सुरू केला.

यात कासोदा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार नरेश ठाकरे कॉन्स्टेबल शरद पाटील ,जितेश पाटील ,नंदू पाटील, सुनील पाटील ,नितीन पाटील,  इम्रान पठाण यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी तुषार मोरे, नितीन पाटील ,यशवंत राक्षे ,विजय चौधरी व इतर ग्रामपंचायत कर्मचारी गावात फिरत असताना त्यांना नवजीवन कलेक्शन, उपकार साडी सेंटर, काजी कलेक्शन ,विश्व कृपा कलेक्शन हे दुकाने सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने व त्यांना वेळोवेळी समज देऊनही ते दुकान उघडे आढळून आल्याने सदर दुकाने शासनाचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत सदर दुकाने सील करण्यात येत आहे.

तसेच लावलेले सील तोडून दुकान सुरू केल्यास दुकानदारा विरुद्ध गंभीर स्वरूपाच्या फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे दुकानदारांना देण्यात आलेल्या नोटिशीत नमूद करण्यात आलेले आहे तसेच गावात विना मास फिरणारे रिकामटेकडे सोशल डिस्ट न न पाडणारे अशा 22 नागरिकांवर कासोदा पोलीस स्टेशन ग्रामपंचायत मार्फत धडक कारवाई करण्यात आली

Leave A Reply

Your email address will not be published.