काळा हनुमान संदर्भात ठेवीदार धडकले निबंधक कार्यालयावर

0

भुसावळ :-  तालुक्यातील सर्वात जास्त ठेवी असलेल्या सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांना रक्कम सातत्याने मागणी करून सुद्धा मिळत नसल्याने  सहाय्यक निबंधक कार्यालयावर  ठेवीदारांनी धडक देऊन आक्रमक भूमिका घेतली. खान्देश ठेवीदार कृती समितीच्या ठेवीदारांनी प्रभारी सहाय्यक निबंधक दराडे यांच्यावर  प्रश्नांची सरबत्ती करून या संस्थेच्या संदर्भात तात्काळ निर्णय लावावा अन्यथा  जिल्हाधिकाऱ्यांच्या कडे दाद मागण्यात येईल अशा पद्धतीचे भूमिका स्वीकारून यापुढे सातत्याने या संस्थेच्या संदर्भामध्ये आंदोलन करण्याच्या इशारा देण्यात आला ठेवीदारांच्या तक्रारी नसल्याने संस्थेच्या विरुद्ध कारवाई करता येत नाही अशा संदर्भातील  सुर निबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या दिसल्याने या संदर्भामध्ये सहाय्यक निबंधक कार्यालय यांच्या भूमिकेच्या संदर्भात आजपर्यंतच्या तक्रारी व संघटनेच्या शनिवारी होणाऱ्या बैठकीत सुद्धा काळाहनुमान ठेवीदारांच्या तक्रारी लिहून या संदर्भामध्ये आक्रमक भूमिका घेण्यात येणार असून पुढील आठवड्यात जिल्हा उपनिबंधकांकडे जाण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा शनिवार 29 जून रोजीच्या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. सत्तावीस कोटीच्या ठेवी असलेल्या काळा हनुमान च्या ठेवीदारांना न्याय द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निबंधक कार्यालय मध्ये ठेवीदारांनी दिला  दिला आहे.

संघटना यापुढे  या संस्थेचे विरुद्ध  आक्रमक भूमिका घेऊन  कारवाईची मागणी करणार असून त्या संस्थेच्या ठेवीदारांना न्याय मिळावा या अनुषंगाने  या आंदोलनात  ठेवीदारांनी मागणी केली आहे.  निबंधक व सहकार खात्याची भूमिका ही या संस्थेच्या संदर्भामध्ये संशयास्पद असून  यापुढे तात्काळ दिलासा न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून इतर संस्थांच्या संदर्भामध्ये सुद्धा सहकार विभागाने ठेवीदारांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे. या संपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी शनिवारी काळा  हनुमान च्या ठेवीदारांची बैठक शामाप्रसाद मुखर्जी उद्यानामध्ये बोलवण्यात आली आहे.  सर्व ठेवीदारांनी उपस्थित राहून या संस्थेच्या संदर्भात आक्रमक भूमिका घ्यावी असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आलेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.