कारगिल शहिद अमर रहे, वंदे मातरम्च्या घोषणांनी भारावला परिसर
जळगाव दि.24-कारगिल शहीदांच्या अस्थि दिल्ली येथे कर्नाटक एक्सप्रेसने निघाल्या असता जळगाव रेल्वे स्थानकावर बुधवारी संध्याकाळी 4.45 वा. गाडी येवून थांबल्यानंतर शहीदांच्या अस्थिंना अभिवादन करण्यात आले. यावेळी कारगिल शहीद अमर रहे, वंदे मातरम्च्या घोषणांनी रेल्वे स्टेशन परिसर राष्ट्रभक्तीने भारावला होता. मान्यवरांकडून शहीदांच्या अस्थिंना अभिवादन करण्यात आले. यावेळी शहीदांना सलामी देण्यात आली. यावेळी महानगरपालिकेचे महापौर सिमा भोळे, उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, उपजिल्हाधिकारी वामन कदम, सुभेदार मेजर अणुव्रत वाकडे, जिल्हा सैनिक कार्यालयाचे अधिकारी, आर.पी. एफ स्टॉफ, एन.सी.सी. कॅडेट आदी उपस्थित होते.