एरंडोल येथे अज्ञात महिलांकडून महिलेला गळफास लावण्याचा प्रयत्न

0

एरंडोल (प्रतिनिधी) :– शहरातील नम्रता नगरात दोन अज्ञात महिलांनी घरात अनधिकृत प्रवेश करून एका महिलेला मारहाण करीत गळफास लावण्याचा प्रयत्न केल्याची घटना २३ रोजी घडली.

नम्रता नगरातील असलेले रहिवासी ममता गोसावी यांच्या घरात दोन अज्ञात महिलांनी प्रवेश केला. यावेळी सौ.गोसावी यांनी तुम्ही कोण आहेत असे विचारले असता त्या अज्ञात महिलांनी ममता गोसावी यांना पलंगावर लोटून त्यांना मारहाण करीत एका हाताने पकडले व त्यांना गळफास लावण्याचा प्रयत्न केला.

यावेळी स्वतःचा बचाव करण्यासाठी ममता गोसावी यांनी एका महिलेच्या हाताला चावा घेतला व दोघी महिलांना त्यांनी लाथा मारून दूर केले व ममता गोसावी यांनी मदतीसाठी आरोळ्या मारल्या तेव्हा त्या महिलांनी त्यांचा मोबाईल घेवून त्या पसार झाल्या. विशेस म्हणजे ममता गोसावी या घरात एकट्याच असतांना हा प्रकार घडला. दरम्यान सीसीटीव्ही केमेरामध्ये दोन्ही महिलांचे फोटो आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.