कारगिल विजय दिवसाची 20 वर्ष पुर्ण

0

नवी दिल्ली : काश्‍मीरच्या कारगिल भागात पाकिस्तानी लष्कराने केलेली घुसखोरी उधळून लावताना पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या युद्धालाआज 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. 26 जुलै 1999 रोजी पाकिस्तानसोबत झालेल्या युद्धात भारताने पाकिस्तानचा पराभव केला. भारतीय सैनिकांनी मोठ्या शर्थीचे प्रयत्न करून पाकिस्तानला धुळ चारली होती. त्यालाच आज 20 वर्ष पुर्ण झाले आहेत.

कारगिल विजय दिवसानिमीत्त द्रासमधील कारगिल युद्ध स्मारकास राष्ट्रपती रामनाथ कोविंद तर दिल्लीतील वॉर मेमोअिलवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह शहिदांना श्रद्धांजली वाहणार आहेत. याशिवाय राज्यासह देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कारगिल विजय दिवसाची 20 वी वर्षपुर्ती देशभरात 25 ते 27 जुलै दरम्यान साजरी करण्यात येणार आहे. याचा समारोप 27 जुलै रोजी इंदीरा गांधी इनडोअर स्टेडिअमवर होणार असून या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.