काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी बळीराम गवई

0

मुक्ताईनगर :- तालुक्यातील काँग्रेसचे जेष्ठ नेते बळीराम दौलतराव गवई यांची जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली . त्यांनी महसुल विभागात प्रशासकीय सेवा दिलेली आहे. सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी या पदावरती सेवा सेवानिवृत्त झालेले आहेत.

त्यांना नियुक्ती पत्र देतेवेळी प्रभारी जिल्हाध्यक्ष राहुलभैया मोरे ,कार्याध्यक्ष मनोजभाऊ सोनावणे , एन.यु.सी.आई जिल्हाध्यक्ष देवेंद्र पटिल ,जळगाव शहराध्यक्ष प्रदीपभाऊ सोनावणे, मुक्ताईनगर शहराध्यक्ष प्रा.पवन खुरपडे ,मुक्ताईनगरअल्पसंख्याक तालुकाध्यक्ष आलम शहा ,, बाबा देशमुख ,देवेंद्र पाटील,नदीमजी काजी ई काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. सर्वत्र त्यांच्यावरती शुभेच्छाचा वर्षाव होत आहे..

Leave A Reply

Your email address will not be published.