काँग्रेसचे आमदार विश्वजित कदमांच्या कारचा भीषण अपघात ; किरकोळ जखमी

0

पुणे – काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांच्या गाडीला बुधवारी रात्री मोठा अपघात झाला. कारमधील एअरबॅगमुळे या अपघातातून विश्वीजीत कदम थोडक्यात बचावले असून ते किरकोळ जखमी झाले आहेत. मुंबईहून पुण्याला येताना रात्री साडेअकरा वाजेदरम्यान ही घटना घडली.

अपघातानंतर कदम म्हणाले कि, मुंबईहून पुण्याला येत असताना काल रात्री पुण्यामध्ये माझी गाडी झाडाला धडकल्याने छोटासा अपघात झाला. सुदैवाने कोणतीही मोठी हानी झाली नाही. मी व ड्रायव्हर दोघेही सुखरूप आहोत. माझ्या डाव्या खांद्याला किरकोळ मार लागला आहे. सर्व वैद्यकीय चाचण्या करून घेतल्या असून कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही तसेच कोणताही धोका नाही. आपल्या सर्वांच्या सदिच्छा पाठीशी आहेतच. मी सुखरूप आहे काळजी नसावी, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचा आज कराड येथे मोठा कार्यक्रम असून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह विश्वजित कदमही उपस्थित राहणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.