कर्नाटक: राजीनामा दिलेल्या एका आमदाराचे बंड मागे

0

बंगळुरु :- काँग्रेससाठी संकट मोचक म्हणून ओळख असलेले डी. के. शिवकुमार यांना अखेर यश आले आहे. राजीनामा दिलेल्या बंडखोर आमदारांना भेटण्यासाठी मुंबईत शिवकुमार यांनी धाव घेतली होती. मात्र,  पोलिसांनी त्यांना रोखत हॉटेलमध्ये प्रवेश करण्यास मज्जाव केला होता. त्यानंतर त्यांना विमानाने बंगळुरुला पाठविण्यात आले होते. मात्र, शिवकुमार यांनी बांधकाम मंत्री एम. टी. बी नागराज यांची भेट घेऊन त्यांची मनधरणी केली. त्यामुळे एका बंडखोर आमदाराचे बंड मागे घेतल्याचे शिवकुमार यांनी सांगितले.याशिवाय इतर आमदारांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून सुरू आहेत.

कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस मैत्री सरकार वाचविण्यासाठी काँग्रेसचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत.   डी. के. शिवकुमार आज पहाटे 5 वाजता नागराज यांच्या घरी पोहोचले. त्यांनी जवळपास पाच तास त्यांच्याशी बातचीत केली. शिवकुमार यांनी नागराज यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. या बैठकीनंतर नागराज काँग्रेससोबतच राहणार असल्याची माहिती शिवकुमार यांनी दिली. तर दुसरीकडे रामलिंग रेड्डी, मुणीरत्ना आणि आर. रोशन बेग यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.