करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक रेल्वेगाड्या रद्द

0

पुणे : मध्य रेल्वेने करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. तसेच प्लॅटफॉर्म तिकीटच्या दरामध्ये वाढ केली आहे. 10 रुपयांचे प्लॅटफॉर्म तिकीट आता 50 रुपयांना मिळणार आहे.

स्थानकाच्या आवारातील आणि प्लॅटफॉर्म वरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. यासह पुणे विभागातील पुणे, मिरज आणि कोल्हापूर स्थानकांतील रिटायरिंग रुम, डोरमेटरी 15 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

1) मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेस 19. मार्च ते 31 मार्च

2) पुणे-मुंबई डेक्कन एक्सप्रेस 18 मार्च ते 30 मार्च

3) लोकमान्य टिळक टर्मिनस -अजनी एक्सप्रेस 18 मार्च ते 30 मार्च

4) अजनी- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस 20 मार्च ते 27 मार्च

5) लोकमान्य टिळक टर्मिनस निजामाबाद एक्सप्रेस 21मार्च ते 28 मार्च

6) निजामाबाद- लोकमान्य टिळक एक्सप्रेस 22 मार्च  ते 29 मार्च

7) नागपूर-रीवा एक्सप्रेस 25 मार्च

8) मुंबई-नागपूर नंदीग्राम एक्सप्रेस 23 मार्च ते 1एप्रिल

9) नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस 22 मार्च ते 31 मार्च

10) पुणे-नागपूर एक्सप्रेस 26 मार्च ते 2 एप्रिल

11) नागपूर-पुणे एक्सप्रेस 20 मार्च ते 27 मार्च

12) पुणे-अजनी एक्सप्रेस 21 मार्च ते  28 मार्च

13) अजनी-पुणे एक्सप्रेस 22 मार्च ते 29 मार्च

14) लोकमान्य टिळक टर्मिनस -मनमाड एक्सप्रेस 18 मार्च ते 31 मार्च

15) मुंबई-पुणे प्रगती एक्सप्रेस 18 मार्च ते 31

16) पुणे-मुंबई प्रगती एक्सप्रेस 19 मार्च ते 1 एप्रिल

17) भुसावळ-नागपूर एक्सप्रेस 18 मार्च ते 29 मार्च

18) नागपूर-भुसावळ एक्सप्रेस 19 मार्च  ते 30 मार्च

19) कलाबुरागी-सिकंदराबाद एक्सप्रेस 18 मार्च ते 31 मार्च

20) हावडा-मुंबई दुरंतो एक्सप्रेस 24 मार्च ते 31 मार्च

21) मुंबई-हावडा दुरंतो एक्सप्रेस 25 मार्च ते 1 एप्रिल

22) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस 20, 23, 27 आणि 30 मार्चला बंद

23) निजामुद्दीन- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस राजधानी एक्सप्रेस 21, 24, 26 आणि मार्च ते  31 मार्च पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबत मध्य रेल्वेने प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.