औरंगाबाद पोलिसांना राहिला नाही मोक्षदा पाटलांचा धाक

0

औरंगाबाद | औरंगाबाद पोलिसांमध्ये वाढलेल्या लाचखोरीच्या घटना लक्षात घेऊन ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या पोलिसांची बैठक घेतली होती. लाचखोरी रोखण्याचं आवाहन त्यांनी या बैठकीत केलं होतं. पोलीस अधीक्षकांनी पोलिसांना लाचखोरी कमी करण्याची तंबी दिली असली तरी मोक्षदा पाटलांचा धाक कमी झाल्याचं चित्र आहे, कारण त्यांच्या आवाहनाला केराची टोपली दाखवत औरंगाबाद पोलिसांकडून लाचखोरी सुरुच आहे. पैठण तालुक्यातील बिडकीन पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि जमादाराला वाळू ठेकेदाराकडून ४ लाख ७५ हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र बनसोडे (रा.औरंगाबाद), जमादार बाबासाहेब दिलवाले (रा.बिडकीन) अशी त्यांची नावं आहेत. त्यांच्यावरील कारवाईनं औरंगाबाद पोलिसांची प्रतिमा धुळीला मिळाली आहे. वाळू चोरीच्या गुन्ह्यात जप्त वाळूसाठ्याची लिलावाप्रमाणे वाहतूक करण्यासाठी ४ लाख ७५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना जालन्याच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.

Leave A Reply

Your email address will not be published.