एरंडोल येथे सलग दुसऱ्या दिवशी चौघे पॉझिटिव्ह

0

एरंडोल (प्रतिनिधी) : शनिवारी येथे पुन्हा एक 19 वर्षीय युवती , एक 27 वर्षीय युवक ३० वर्षीय डॉक्टर, व एक ३५ वर्षीय कंपाउंडर. हे चैघे पॉझिटिव्ह निघाल्याची माहिती प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी दिली आहे. शुक्रवार नंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी चार जण कोरोना बाधित झाल्याचे जाहीर झाल्यामुळे एरंडोल करांची झोप उडाली आहे. येथे रुग्ण संख्येत होत असलेल्या वाढीमुळे नागरिकांमध्ये अधिक चिंता पसरली आहे कोरोना च्या विषाणूंनी हळूहळू आपला विळखा मजबूत करण्याचा प्रकार सुरु झाल्यामुळे येथे एकच खळबळ उडाली आहे
आतापर्यंत एरंडोल येथे कोरोना बाधितांची संख्या 10पर्यंत पोहचली आहे कोरोना बाधितांवर उपचार करणारे डॉक्टर व त्यांना मदत करणारे कंपाउंडर हेसुद्धा पॉझिटिव्ह निघाल्यामुळे आता कोणत्याही आजाराच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर पुढे येतील काय हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा या गंभीर परिस्थितीत आजारी पडलेल्या लोकांवर उपचार कसा होणार याची चिंता नागरिकांना त्रस्त करीत आहे. केवळ वयोवृद्धन वरच कोरोना ची बाधा होते असे नसून कोरोना बाधितांच्या संपर्कात कोणीही आला त्याची सुटका होणे अशक्य आहे असे यावरून स्पष्ट होते.

मे महिन्यात शेवटी शेवटी कोरोना च्या संकटाने एरंडोल नगरीत आपले हातपाय पसरले त्यामुळे आठवडाभरातच कोरोना रुग्णांची संख्या दहा वर पोहोचली आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत अशीच वाढ होत राहिली तर लवकरच संपूर्ण एरंडोल शहराचे हॉट स्पॉट मध्ये रूपांतर झाल्याशिवाय राहणार नाही. तूर्तास तरी एरंडोल शहर हे कोरोनाच्या संकटामुळे प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये विभागले गेले आहे.
शहरामध्ये ठीक ठिकाणी सीमा बंदी व तटबंदी दिसून येते. आतातरी शहरवासीयांनी सावध होणे गरजेचे आहे ‌

सर्वांनी नाका-तोंडावर मास्क, फिजिकल डिस्टन्सींग चे दैनंदिन जीवनात पालन,करणे. शक्यतोवर घरीच सुरक्षित राहणे यासारख्या नियमांचे व लॉक डाऊन च्या नियमांचे पालन करणे हे सर्वांच्या हिताचे ठरणार आहे.

पॉझिटिव्ह निघालेली १९ वर्षीय नात ही बालाजी मढी परिसरातील पॉझिटिव्ह असलेल्या ६५ वर्षीय महिलेची नात आहे. तर एका खाजगी डॉक्टरचा कंपाउंडर ३५ वर्षीय हा कोरोना ग्रस्त झाला आहे ‌ एवढेच काय कोरोना बाधित रुग्णावर उपचार केलेल्या एका ३० वर्षीय युवा डॉक्टरला सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह होण्याचा प्रसंग आलेला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.