ताडे येथे कोरोना संशयित रुग्ण आढळून आल्याने खळबळ

0

निपाणे ता, एरंडोल (वार्ताहर) : येथून जवळच असलेल्या ताडे येथे कोरोना संशयित रुग्ण आढळून आल्याने ग्रामीण भागात खळबळ उडाली आहे. ताडे गावकऱ्यांनी तिनं दिवसांसाठी बंद पुकारला असून किराणा दुकान सह इतर दुकानेही बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

तसेचबाहेरील व्यक्तींना गावात प्रवेश नाकारला आहे तिन दिवस कुणीही गावात प्रवेश करु नये असे आवाहन करण्यात आले आहे व गावकऱ्यांनी ही काम असेल तरच बाहेर निघावे घरातून निघतांना तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधावा हात वारंमवार साबणाने स्वच्छ धुवावेत स्वच्छता पाळावी घर व परीसर स्वच्छ ठेवावा असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच प्रत्यकाने शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे असेही सुचवण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गावात सर्वोतोपरी प्रयत्न ग्राम पंचायत तर्फे करण्यात येत असल्याचे दिसते.

Leave A Reply

Your email address will not be published.