एरंडोल येथे रक्तदान शिबिरात 95 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

0

एरंडोल: – येथील कैलास वासी रमेश गणपती काबरे चारीटेबल ट्रस्ट व रेड क्रॉस सोसायटी जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने दि 13 नोव्हेंबर बुधवार रोजी बेल वेदर इंग्लिश मीडियम स्कूल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले . याप्रसंगी रक्तदान शिबिराचे उद्घाटन 95 रक्तदात्यांनी रक्तदान केलसकाळी नऊ वाजता रक्तदान शिबिराचे उद्घाटन लोक नियुक्त नगराध्यक्ष रमेश परदेशी यांचे हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी युवा उद्योजक संजय काबरा होते

याप्रसंगी बालाजी उद्योग समूहाचे जेष्ठ संचालक दिनेश काबरा अनिल काबरा, शांतनु काबरा,  नगरसेवक कुणाल महाजन अतुल महाजन परेश बिर्ला सतीश परदेशी नगरसेवक असलम पिंजारी आदींची उपस्थिती होती.

शिबिराच्या यशस्वितेसाठी रेडक्रॉस सोसायटीचे डॉक्टर एस  बी सोनवणे वीरेंद्र बिराडे, रवींद्र जाधव, यांनी परिश्रम घेतले. आभार प्रसाद काबरा यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.