एप्रिलमध्ये तब्बल 15 दिवस बँका बंद, वाचा संपूर्ण लिस्ट

0

मुंबई : नव्या आर्थिक वर्षाला १ एप्रिलपासून सुरुवात होतेय. यंदाच्या एप्रिल महिन्यात देशातील बँका तब्बल १५ दिवस बंद राहणार आहेत.  त्यामुळे गैरसोय टाळून बँकांची कामे उरकण्यासाठी ग्राहकांना एप्रिल माहियाचे कॅलेंडर पाहूनच नियोजन करावं लागेल.

विविध बँकांच्या सुट्टीमुळे 9 दिवस बंद राहतील. सुट्टीशिवाय प्रत्येक महिन्याच्या दुसर्‍या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात. म्हणून, एप्रिल 2021 मध्ये शनिवार आणि रविवारी जोडल्यास एकूण 15 दिवस बँका बंद असतील.

खरंतर, बँकेचा पहिला कार्य दिवस एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात 3 एप्रिल रोजी असेल. म्हणजेच 1 आणि 2 एप्रिल रोजी बँकांमध्ये कामकाज होणार नाही. अशा परिस्थितीत आज आपली महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करून घ्या.

वाचा काय आहे संपूर्ण महिन्याच्या सुट्टीची यादी

– 1 एप्रिल – बँकांची वार्षिक खाती बंद झाल्यामुळे सरकारी आणि खासगी बँका बंद राहतील.

– 2 एप्रिल- बेलापूर, बेंगलुरू, भोपाळ, भुवनेश्वर, चेन्नई, डेहराडून, गंगटोक, हैदराबाद, इम्फान, कानपूर, कोची, कोलकाता, लखनऊ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पणजी, पटना, रायपूर, रांची, शिलांग आणि तिरुअनंतपुरममध्ये गुड फ्रायडे म्हणून बँका बंद राहतील.

– 5 एप्रिल – बाबू जगजीवन राम यांच्या वाढदिवसानिमित्त हैदराबादमध्ये बँक बंद राहील.

– 6 एप्रिल – तामिळनाडू विधानसभा 2021 च्या सार्वत्रिक निवडणुका आहेत. त्यामुळे चेन्नईमध्ये खासगी आणि सार्वजनिक बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही.

– 13 एप्रिल – गुढी पाडवा, तेलगू नववर्ष, उगाडी पर्व, साजिबु नोंगमापनबा (चीरोबा), नवरात्र, बेलापूरमधील बैशाखी, बेंगलुरू, चेन्नई, हैदराबाद, इम्फाल, जम्मू-काश्मीर, मुंबई, नागपूर, पणजी आणि श्रीनगर इथे बँका बंद राहतील.

– 14 एप्रिल – डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती / तमिळ नवीन वर्षाचा दिवस / विशु / बिजू महोत्सव / चिरोबा / बोहाग बिहू यांच्यामुळे अगरतला, अहमदाबाद, बेलापूर, बेंगलुरू, भुवनेश्वर, चेन्नई, डेहराडून, गंगटोक, गुवाहाटी, हैदराबाद, इम्फाल, जयपूर, जम्मू, कानपूर, कोची, कोलकाता, लखनऊ, मुंबई, नागपूर, पणजी, पटना, रांची, श्रीनगर आणि तिरुअनंतपूर इथे बँका बंद राहतील.

– 15 एप्रिल – हिमाचल दिन, बंगाली नववर्ष दिन, बोहाग बिहू, सरहुल या निमित्ताने अगरतला, गुवाहाटी, कोलकाता, रांची आणि शिमला इथे बँका बंद राहतील.

– 16 एप्रिल – बोहाग बिहूच्या निमित्ताने गुवाहाटीमध्ये बँक बंद असेल.

– 21 एप्रिल – अगरतला, अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, डेहराडून, गंगटोक, हैदराबाद, जयपूर, कानपूर, लखनऊ, मुंबई, नागपूर, पाटणा, रांची आणि शिमला इथे राम नवमी आणि गारिया पूजनानिमित्त बँका बंद राहतील.

रविवारी व्यतिरिक्त दुसर्‍या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात. 4, 11, 18 आणि 25 एप्रिल रोजी रविवार आहे तर 10 एप्रिल आणि 24 एप्रिल रोजी दुसर्‍या आणि चौथ्या शनिवारी बँक बंद असेल. या दिवसांवर बँक शाखा बंद राहतील, परंतु मोबाईल आणि इंटरनेट बँकिंग नेहमीप्रमाणे कार्य करत राहील. ग्राहक ऑनलाईन मोडद्वारे व्यवहार करू शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.