एक रुपयाचा कडीपत्ता ,सरकार झाले बेपत्ता, या घोषणांनी आशा स्वयंसेविकांनी पं.स.परिसर दणाणून सोडला

0

मलकापूर:- तालुक्यातील आशा सेविकांनी आज पंचायत समिती मलकापूर येथे त्यांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात केले.

कोरोना काळामध्ये सरकारने आम्हाला आमच्या जिवाची पर्वा न करता आम्हाला राबराब राबविले व आम्हाला दिलेले आश्वासन अद्यापही पूर्ण न केल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आली असून आशा स्वयंसेविकांना अठरा हजार रुपये गटप्रवर्तक यांना एकवीस हजार रुपये मानधन द्या अशा विविध मागण्यांचे निवेदन आज पंचायत समिती गट विकास अधिकारी सुभाष मानकर यांना देण्यात आले.

सरकारने आम्हाला 16 महिन्यांपासून राब राब राबविले मात्र आम्हाला प्रतिदिन तेहतीस रुपये रोज दिल्याने या  33 रुपयांमध्ये आमच्या घरी येणाऱ्या दुधाचा खर्च ही भागत नसल्याने आमची एक प्रकारचे थट्टा हे सरकार करत आहे,या सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आमच्या मागण्या पूर्ण न झाल्याने आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन करू असा इशारा आशा स्वयंसेविका सि.टु.चे जिल्हा कमेटीध्यक्ष पंजाबराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात सचीव चंदा झोपे,मलकापुर तालुकाध्यक्षा जयश्री तायडे, उपाध्यक्षा वनिता वराडे,सचीव मिरा दांडगे,सदस्या शालीनी डवले,लतीका गारमोडे सह  तालुक्यातील आशा स्वयंसेविकां,गटप्रवर्तक संघटना मलकापूर जिल्हा बुलढाणा यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.