एपीएमसी बाजारपेठेत खाद्यतेलाचे दर ३० रुपयांची घसरले

0

 मुंबई: कोरोना काळात देशात खाद्य तेलाच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढले आहे. याचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसत आहे. हीच बाब ओळखून केंद्रसरकारने खाद्यतेलाची मोठ्या प्रमाणात आयात सुरू केल्यामुळे खाद्यतेलाच्या किमतीत घसरण झाल्याचे दिसत आहे. परिणामी मुंबई एपीएसमी मसाला मार्केटमध्ये तेलांची किंमतीत प्रतिकिलो 30 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी खरेदीला येणाऱ्या ग्राहकांना वाढत्या महागाईत चांगलाच दिलासा मिळाला आहे. आयातीमुळे गेल्या महिन्याभरापासून गगनाला पोहोचलेल्या खाद्यतेलाचे किंमती आता खाली येत आहेत.

भारतात 60 टक्के खाद्यतेल आयात केले जाते, तर 40 टक्के तेल भारतात तयार होते. कोरोनाकाळात बाहेरगावी होणाऱ्या तेलाचे उत्पादन कमी झाल्याने तेलाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला होता. शिवाय भारतात तेलाची मागणी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे मागणी जास्त आणि पुरवठा कमी झाल्याने तेलाच्या किमती जवळपास 40 टक्क्यांनी वाढल्या होत्या. मात्र, आता तेलाचे उत्पादन वाढले असून केंद्र सरकारने तेल्याच्या आयातीवरील आयात शुक्ल कमी केल्याने खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. तर सध्या तेलाच्या दरात यापेक्षा पाच ते दहा रुपये अजून कमी होण्याची शक्यता असल्याचे तेलाचे घाऊक व्यापारी महेश गेडे यांनी सांगितले.

सद्यस्थितीत कॉटन तेलाचे बाजारभाव स्थिर असून शेंगदाणा तेल प्रतिकिलो 180 वरून 150 रुपये झाले आहे. सूर्यफूल तेल प्रतिकिलो 170 रुपयांवरून 140 रुपये झाले, सोयाबीन तेल प्रतिकिलो 160 रुपयांवरून 130 रुपये झाले तर पाम तेल प्रतिकिलो 155 रुपयांवरून 155 रुपये झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.