एकनाथ खडसे राष्ट्रवादीत नाही तर ‘या’ पक्षात जाण्यास इच्छुक

0

नागपूर : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे भाजपवर नाराज असून त्यांनी अनेकवेळा पक्ष सोडण्याचा इशारा देखील दिला आहे. दरम्यान खडसे शरद पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र खडसे यांनी मी राष्ट्रवादीत नाही तर रामदास आठवलेंच्या ‘रिपाइं’मध्ये जाण्यास इच्छुक आहे, असं खडसेंनी म्हणाले आहे. खडसेंच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात आता जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

“मी राष्ट्रवादी नाही तर रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाइं) या पक्षात जाण्यास इच्छुक आहे. यासाठी मी रामदास आठवलेंकडून परवानगी घेणार आहे”, अशी उडवा उडवीची उत्तर खडसेंनी पत्रकारांना दिली.एकनाथ खडसे आज (18 डिसेंबर) नागपूर येथे शरद पवारांची भेट घेण्यासाठी आले होते. त्यामुळे खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा सुरु झाली होती. यावर पत्रकारांनी खडसेंना विचारले असता त्यांनी उडवा उडवीची उत्तर देत मी आठवलेंच्या पक्षात जाणार असल्याचे म्हटले. खडसेंच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात आता जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.