पाचोऱ्यात ग्राहक प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन

0

पाचोरा (प्रतिनीधी) : पाचोरा येथे दिनांक २४ रोजी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा – पाचोरा तर्फे ग्राहक प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे. यात विविध शाळामधील विद्यार्थ्यांना व ग्राहकांना आपल्या हक्क व कर्तव्याच्या जाणिवेसाठी विविध खात्याच्या अधिकारी व तज्ञ मार्गदर्शक मंडळींना आमंत्रित करून त्यांचे प्रबोधनपर मार्गदर्शन दिले जाणार आहे. यासाठी विविध सामाजिक संस्था, सेवाभावी संस्था, रेशनदुकानदार, गॅस एजन्सी, व्यापारी, यांना निमंत्रित करण्यात आले आहे. सदरचा कार्यक्रम ग्राहक पंचायत शाखा पाचोरा व महसूल विभाग पाचोरा यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. शाखा अध्यक्ष डॉ. अनिल देशमुख, सचिव संजय पाटील, तालुका संघटक गिरीष दुसाने यांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

अहिर सुवर्णकार मंगल कार्यालयात ग्राहक सेवा संघातर्फे कार्यक्रम
‌‌‌पाचोरा येथील ग्राहक सेवा संघातर्फे देशमुख वाडी येथील अहीर सुवर्णकार मंगल कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा होणार आहे. कार्यक्रमात इयत्ता ९ वी ते १० च्या मूला मुलींच्या गटांसाठी “ग्राहक संरक्षण कायदा, ग्राहक हिताचा फायदा”, या विषयावर तर १० वी १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी “ग्राहक चळवळ काळाची गरज” या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात डॉ. युवराज परदेशी, अनिल वडर, प्राचार्य डी. एफ. पाटील, आनंद नवगिरे हे मार्गदर्शन करणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन कार्याध्यक्ष तालुका सह संघटक शरद गिते, डॉक्टर्स प्रतिनिधी, डॉ. मुकेश तेली,. पी. बागुल, लता शर्मा यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.