भुसावळात अलायन्स मराठी चर्चतर्फे उद्यापासून विविध कार्यक्रम

0

ख्रिस्त जन्मोत्सव : कॅरल सिगिंगसह विविध कार्यक्रमांची धूम
भुसावळ (प्रतिनिधी) : शहरात नाताळपर्वानिमित्त विविध चर्चमध्ये कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. भुसावळातील अलायन्स मराठी चर्चतर्फे कॅरल सिगिंगसह विविध स्पर्धांचे आयोजन 19 ते 1 जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे. शहरात नाताळनिमित्त खिस्ती बांधवांमध्ये अपूर्व उत्साह आहे.

19 ते 1 दरम्यान विविध कार्यक्रम
19 ते 21 दरम्यान दररोज सायंकाळी सात वाजता कॅरल सिगिंगचा कार्यक्रम तरुण संघ अधयक्ष नवीन एम.जाधव सादर करतील. रविवार, 22 रोजी सकाळी नऊ वाजता तसेच सायंकाळी सात वाजता कॅरल सिगिंग व प्रभू उपासना होईल. सोमवार 23 रोजी सायंकाळी सात वाजता कॅरल सिगिंग, मंगळवार, 24 रोजी सकाळी 10 वाजता व सायंकाळी सात वाजता चर्च स्वच्छता व डेकोरेशन तसेच ख्रिस्त जन्मोत्सव पूर्वसंध्या विशेष उपासना होईल. बुधवार, 25 रोजी सकाळी नऊ वाजता खिस्त जन्मोत्सव विशेष उपासना होईल. गुरुवार, 26 रोजी दुपारी 12 वाजता विविध स्पर्धा होतील. शुक्रवार, 27 रोजी सायंकाळी सहा वाजता संडे स्कूल कार्यक्रम तसेच शनिवार, 28 रोजी सकाळी नऊ वाजता चर्च पिकनिक, रविवार, 29 रोजी सकाळी नऊ वाजता प्रभूवार उपासना, सोमवार, 30 डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता चित्रकला व निबंध स्पर्धा तसेच सायंकाळी सात वाजता प्रीती भोज कार्यक्रम होईल. मंगळवार, 31 डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजता भजन व वॉचनाईट सर्विस मंडळीस चहापान तसेच बुधवार, 1 जानेवारी रोजी नवीन वर्ष विशेष उपासना व प्रभू भोजन होईल. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पास्टर स्वप्नील नाशिककर, अध्यक्ष प्रवीण ओहोळ, सचिव फिलीप फ्रान्सीस, खजिनदार प्रेमचंद जाधव व पंच जया फ्रान्सीस मणी परीश्रम घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.