मुंबई-नागपूर दरम्‍यान धावणार विशेष गाड्‍या

0

भुसावळ- आगामी नाताळ सणानिमीत्त मुंबई-नागपूर-मुंबई दरम्‍यान (३फेरी) विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला असल्याची माहिती भुसावळ रेल्वे वाणिज्य विभागातर्फे प्रसिद्धीसाठी देण्यात आली आहे.

गाडी क्रमांक – ०२०३५ डाऊन मुंबई – नागपूर विशेष गाडी मुंबई येथून शनिवार दि. २१ डिसेंबर रोजी १२.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी नागपूरला ३.१० वाजता पोहोचेल.गाडी क्रमांक – ०२०३६ अप नागपूर – मुंबई विशेष रेल्वेगाडी ही रविवार दि.२२ डिसेंबर रोजी ३-३० वाजता नागपूरहून सुटेल व दुसर्‍या दिवशी ६.१५ वाजता मुंबईला पोहोचेल.
सदर गाड्‍या मार्गात दादर,ठाणे, कल्याण, इगतपुरी,नाशिकरोड, भुसावळ,मलकापूर,शेगाव, अकोला,बडनेरा,धामणगाव,वर्धा या स्‍थानकावर थांबेल.
यात ३वातानुकूलित तृतीय श्रेणी, १४ शयनयान व ४ सामान्य द्वितीय श्रेणी डबे असतील.

Leave A Reply

Your email address will not be published.