एकनाथ खडसेंना ईडीची तारीख आली की कोरोना होतो ; गिरीश महाजनांचा खोचक टोला

0

जळगाव :  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीची तारीख आली कि कोरोना होतो, असा सणसणीत टोला भाजप नेते आ. गिरीश महाजन यांनी लगावला आहे. आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

सर्वत्र कोरोनाची रूग्णसंख्या वाढीस लागली असतांना जळगाव जिल्ह्यात स्थिती अतिशय गंभीर बनली असल्याचा आरोपही गिरीश महाजन यांनी केला. याप्रसंगी एकनाथराव खडसे यांनी गिरीश महाजन यांच्या सारख्या युवा नेत्याला कोरोना कसा झाला? या वक्तव्याची आठवण करून दिली. यावर आमदार महाजन म्हणाले की, माझा कोरोना हा खराखुरा असून ईडीचा कोरोना नाही. मला एकनाथ खडसेंसारखं ईडीच्या तारखा पाहून कोरोना होत नसल्याची खोचक टीका महाजन यांनी केली. याप्रसंगी आ. महाजन यांनी जिल्ह्यात कोरोनाच्या स्थितीसाठी सत्ताधारी कारणीभूत असल्याचा आरोप केला.

यावेळी आ.राजुमामा भोळे, आ.चंदूभाई पटेल, माजी महापौर भारती सोनवणे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, अधिष्ठाता जयप्रकाश रामानंद, नगरसेवक कैलास सोनवणे, धीरज सोनवणे यांच्यासह इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.