एकनाथ खडसेंच्या प्रयत्नातून बोदवड शहरात सीसीटीव्ही कँमेरे लावण्याचे काम सुरू

0

बोदवड – शहरातील वाढत्या चोरीच्या घटना पाहता व सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नातून व नगरपंचायत अंतर्गत तसेच पोलीस प्रशासानाच्या सहकार्याने शहरातील प्रमुख २२ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी बोदवड शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता.त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.शहरात वाढत्या चोरीच्या घटना पाहता पोलिस प्रशासनाला या चोरट्यांना पकडण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती.शहरातील प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यास फुटेज वरून चोरांना पकडणं सोपं होईल.व चोरीच्या घटना थांबतील अशी अपेक्षा पोलिस प्रशासनाला होती.तसेच सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन बोदवड येथील सत्ताधारी नगरसेवकांनी माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांची भेट घेऊन हा विषय मार्गी लावण्याची मागणी केली होती.अखेर माजी मंत्री एकनाथराव खडसे प्रयत्नातून बोदवड नगर पंचायत प्रशासनाने जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला होता.अखेर या पाठपुराव्याला यश मिळाले असून जळगाव जिल्हाधिकारी श्री.अविनाश ढाकणे यांनी दि.१९ सप्टेंबर २०१९ रोजी दिलेल्या मंजुरीनंतर जिल्हा वार्षिक योजना सन २०१९-२०२०(नाविण्यपूर्ण योजना) अंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी २५ लाख रुपये निधी मंजूर झाला असून

 

Leave A Reply

Your email address will not be published.