गिरणेच्या काठावरील गाव उत्राण ? अस्मानी संकटांचा ताण

0
एरंडोल प्रतिनिधी…
एरंडोल तालुक्यातील उत्राण अ.ह व उत्राण गु.ह या दोन्ही गावांसह परिसरात यावर्षी आस्मानी संकटांनी तडाखा दिल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. पावसाळ्यात ढग फुटी मुळे खरीप पिकांचे व फळबागांचे प्रचंड नुकसान झाले त्यानंतर 12 डिसेंबर रोजी सायंकाळी सुपारीच्या आकाराच्या जवळपास पंधरा मिनिटे गारांचा पाऊस पडला त्यामुळे पुन्हा हरभरा, कापूस, दादर, पेरू, लिंबू या फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यंदा उत्राण परिसराला खरिपाच्या वेडी ढगफुटी व रब्बीच्या वेळेला गारपीट अशी दोन्ही आस्मानी संकटे कोसळली त्यामुळे शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले आहे.
       एरंडोल तालुक्यात गेल्यावर्षी कोरडा दुष्काळ असल्यामुळे यावर्षी निसर्ग साथ देईन या आशेवर शेतकरी नव्या उमेदीने खरीप व रब्बी हंगामा कडे डोळे लावून बसला होता मात्र पावसाळ्याच्या पूर्वार्धात उत्राण परिसराला अतिवृष्टीचा तडाखा बसला अतिवृष्टीच्या संकटामुळे पिके पाण्यात वाहून गेली जवळपास एक तास ते दीड तास पर्यंत अतिवृष्टीने या परिसराला झोडपून काढले तर उत्तरार्धात अवकाळी पावसासह गारपीट झाली त्यामुळे रब्बी पिकांचे कापूस, लिंबू, व पेरू या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. उत्राण परिसरावर निसर्ग कोपला कि काय अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे कधी ढगफुटी तर कधी गारपीट असा अनुभव उत्राण परिसरातील शेतकऱ्यांना आला आहे. दरम्यान एरंडोल पंचायत समितीचे उपसभापती उत्राण येथील रहिवाशी अनिल महाजन यांनी प्रशासनाकडे निवेदन पाठवून शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.